Samsung Dual Screen Phones : आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये होणार्‍या गॅलेक्सी अनपॅक्ड 2022 इव्हेंटमध्ये फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोनचा नेक्स्ट जनरेशन फोन लॉन्च करण्यास तयार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग या इव्हेंटमध्ये Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 सादर करू शकतो. अशातच लॉन्चपूर्वी Galaxy Z Flip 4 चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहे. अलीकडेच Galaxy Z Flip 4 चे एक पोस्टर लीक झाले आहे. ज्यामध्ये या फोनचे अधिकृत फोटो समोर आले आहेत. मात्र यावर फारशी माहिती उपलब्ध नाही. यात फक्त हे सूचित करण्यात आले आहे की, हा डिव्हाइस बोरा पर्पल रंग पर्यायात उपलब्ध असेल.


Snapdragon 8+ Gen 1 SoC प्रोसेसर मिळेल


लीक झालेल्या फोटोंमध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण याआधीच फीचर्सची माहिती लीक झाली आहे. Galaxy Z Flip 4 5G मध्येही Snapdragon 8+ Gen 1 SoC दिले जाऊ शकते. तसेच Klacom ची नवीन चिप देखील Galaxy Z Fold 4 मध्ये असण्याची शक्यता आहे. ही चिप 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसह दिली जाऊ शकते. Galaxy Z Flip 4 स्मार्टफोन Android 12 वर चालेल अशी शक्यता आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy Z Flip 4 मध्ये 25W फास्ट-चार्जिंग सपोर्ट आणि 10W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 3,700mAh बॅटरी दिली जाऊ शकते. या फोनच्या पुढील भागात 10-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. जो नॉचऐवजी अंडर डिस्प्लेमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे.


Galaxy Z Flip 4 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देखील दिला जाऊ शकतो. फोनच्या बाहेरील बाजूस 2.1-इंचाचा सॅमोलेड डिस्प्ले देखील असेल. सॅमसंगच्या आगामी फ्लिप स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड शूटर असण्याची अपेक्षा आहे.


महत्वाच्या बातम्या :