मुंबई: क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास 2 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय पेटीएमनं काही तासाताच मागे घेतला आहे. पेटीएमनं घेतलेल्या नव्या निर्णयावर चहूबाजूंनी मोठी टीका होत होती. त्यानंतर हा निर्णय ग्राहकहितासाठी घेण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं आहे.

नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर कॅशलेस व्यवहारांसाठी पेटीएमचा वापर होतो आहे. मात्र, अनेक ग्राहक क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये पैसे ट्रान्सफर करतात. नंतर ते पैसे बँक खात्यात ट्रान्स्फर होतात. त्याचा कंपनीला कोणताही फायदा होत नाही असं कंपनीचं म्हणणं होतं.

‘कंपनीला बँक ट्रांझॅक्शनसाठी मोठी किंमत द्यावी लागते. अनेकजण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरुन ते पुन्हा आपल्या बँक खात्यात टाकतात. त्यामुळे कंपनीला नुकसान सोसावं लागतं. जेव्हा यूजर्स पेटीएमवरुन एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हाच कंपनीला फायदा होतो.’ असं काल कंपनीनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं होतं.

मात्र, या निर्णयानं पेटीएम यूजर्सनं बरीच नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अवघ्या काही तासात पेटीएमनं हा निर्णय मागे घेतला. पेटीएमनं आपला निर्णय मागे घेतल्यामुळे यूजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या:

क्रेडिट कार्डमधून Paytmमध्ये पैसे भरल्यास आता 2% चार्ज!