मार्क झुकरबर्गच्या घरी पुन्हा पाळणा हलणार!
एबीपी माझा वेब टीम | 10 Mar 2017 10:14 AM (IST)
फोटो सौजन्य: मार्क झुकरबर्ग फेसबुक पेज
न्यूयॉर्क: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. झुकरबर्ग आणि पत्नी प्रिसिला हे पुन्हा आई-बाबा होणार आहेत. ही गोड बातमी स्वत: झुकरबर्गनं आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन दिली. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये झुकबर्ग म्हणतो की, 'मी आणि प्रिसिला फार खुश आहोत, आम्हाला आणखी एका मुलीची आशा आहे.' झुकरबर्गनं याबाबत एक संपूर्ण पोस्ट लिहली आहे. झुकरबर्ग म्हणतो की, 'पहिली मुलगी 'मॅक्स'च्या जन्मानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्या बाळाचा विचार करु असं वाटलं नव्हतं. पण जेव्हा मला प्रिसिला पुन्हा गरोदर असल्याचं समजलं तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला की, बाळ तंदुरुस्त असावं. त्याचवेळी माझ्या मनात विचार आला की, आम्हाला दुसरीही मुलगीच व्हावी.' यावेळी झुकरबर्गनं आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मी तीन बहिणींसोबत वाढलो तर प्रिसिलाही दोन बहिणींसोबत मोठी झाली. त्यामुळे आमच्या आयुष्यात मुलींचं स्थान खूप मोठं आहे. असं झुकरबर्ग म्हणाला. दरम्यान, 2015 साली झुकरबर्गला पहिली मुलगी झाली होती. तिचं नाव मॅक्स ठेवण्यात आलं होतं. संबंधित बातम्या: