या निर्णयामुळे पेटीएमच्या ट्रॅफिकमध्ये तब्बल 435 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोटा रद्द झाल्याच्या घोषणेनंतर पेटीएमच्या वापरामध्ये तब्बल 250 टक्क्याने वाढ झाली. तर पेटीएमचं अॅप डाऊनलोड करण्याऱ्यांच्या संख्येत 250 टक्क्यांनी वाढ झाली.
पेटीएमचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) मधुरा देवडा यांनी सांगितलं की, काळा पैसा आणि नकली नोटा बाहेर काढण्यासाठी उचलण्यात आलेलं हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला आमचा देखील पाठिंबा आहे. व्यवहारासाठी पेटीएमचा जास्तीत जास्त वापर सध्या केला जात आहे. '
दरम्यान, पेटीएमसोबतच ओला मनी, फ्री चार्ज आणि मोबिक्विक यांच्या (डिजिटल पेमेंट कंपनी) वापरातही प्रचंड वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या
एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती