मुंबई : पॅनासॉनिक इंडियाने मंगळवारी भारतात तीन टफपॅड डिव्हाईस मार्केटमध्ये लॉन्च केले. यामध्ये टफपॅड एफझेड-F1 आणि टफपॅड एफझेड-N1 यांचा समावेश आहे. त्याचसोबत टफपॅड एफझेड-A2 टॅबलेट लॉन्च करण्यात आला आहे. बिझनेस क्लाससाठी बनवलेल्या या तिन्ही प्रीमियम डिव्हाईसचं खास वैशिष्ट्य म्हणजे क्वालिटी.
अँड्रॉईड डिव्हाईसची किंमत 99 हजार रुपये, तर विंडोज 10 वर आधिरत स्मार्टफोनची किंमत 1 लाख 9 हजार रुपये आहे. टॅब्लेटही अँड्रॉईडवर चालणारा असून, त्याची किंमत 1 लाख 20 हजार रुपये आहे. मूळ किंमतीशिवाय प्रत्येक डिव्हाईसवर अतिरिक्त टॅक्स आकारला जाईल.
पॅनासॉनिक टफपॅड एफझेड-F1 आणि एफझेड-N1 या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स जवळपास सारखे आहेत. मात्र, दोन्ही स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टम वेगळ्या आहेत.
टफपॅड एफझेड-F1, एफझेड-N1 चे फीचर्स -
- 2.3 गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 चिपसेट
- 2 जीबी रॅम
- 4.7 इंचाचा एचडी डिस्प्ले (720x1280 पिक्सेल रिझॉल्युशन)
- वाय-फाय, 2G, 3G, 4G LTE कनेक्टिव्हिटी
- जीपीएस, एनएफसी, ब्लूटूथ (V 4.1)
- मायक्रो यूएसबी
- 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
टफपॅड एफझेड-A2 चे फीचर्स -
- 6.0 मार्शमॅलो
- ओएस इंटरप्राईज सिक्युरिटी
- 1.44 गीगाहर्ट्झ क्वाड कोअर इंटल एटम एक्स 5 - झेड 8550 प्रोसेसर
- 4 जीबी रॅम
- 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज
- 10.1 इंचाचा डिस्प्ले (1920x1200 पिक्सेल रिझॉल्युशन)
- वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी कनेक्टिव्हिटी
- 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 2 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा