मुंबई : रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशीप ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना 1 एप्रिल 2018 पर्यंत 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरचा लाभ घेता येईल. 170 दिवसात 10 कोटी ग्राहक जोडल्याच्या निमित्ताने जिओने ही घोषणा केली आहे.


99 रुपयांची प्राईम मेंबरशीप घेतल्यानंतर 303 रुपये प्रति महिना दराने 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरचा लाभ एक वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिल 2018 पर्यंत घेता येईल. 31 डिसेंबरला 'वेलकम ऑफर' संपल्यानंतर 1 जानेवारीपासून 'हॅप्पी न्यू ईयर' ही ऑफर लाँच करण्यात आली होती. 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरनुसार सध्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत प्रति दिन 1GB डेटा आणि मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे.

प्राईम मेंबरशीप न घेतल्यास काय होईल?

1 मार्च ते 31 मार्च या काळात प्राईम मेंबरशीपसाठी नोंदणी करता येईल. मात्र मेंबरशीप न घेतल्यास तुमचं जिओ सिम प्रीपेड किंवा पोस्टपेडमध्ये बदलण्यात येईल. त्यानुसार तुम्हाला जिओच्या टेरिफ प्लॅननुसार रिचार्ज करावं लागेल. सप्टेंबर 2016 मध्ये जिओने टेरिफ प्लॅन लाँच केले होते. टेरिफ प्लॅननुसारही व्हॉईस कॉलिंग मोफत असेल, केवळ डेटाचे पैसे मोजावे लागतील.



काय आहेत टेरिफ प्लॅन?

50 रुपयात 1GB 4G डेटा, 999 रुपयात 10GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा), 1499 रुपयात 20GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा), 2499 रुपयात 35GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा)

जिओ प्राईम मेंबरशीप कुणाला घेता येईल?

जिओच्या प्राईम मेंबरशीपचा लाभ सध्याच्या 10 कोटी ग्राहकांना आणि 31 मार्चपर्यंत नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना मिळेल. यासाठी नोंदणी प्रक्रिया 1 मार्चला सुरु करण्यात येईल, तर 31 मार्च अंतिम तारीख असेल. प्राईम मेंबरशीपसाठी जिओ युझर्सला 99 रुपये मोजावे लागतील, तर एक वर्षासाठी ही मेंबरशीप असेल.

जिओ प्राईम मेंबरशीप कशी मिळवाल?

प्राईम मेंबरशीप जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवरुन मिळवता येईल. शिवाय जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल.

जिओ प्राईम मेंबरशीपचे फायदे

मेंबरशीप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप एक वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल, असं अंबानींनी सांगितलं.

मेंबरशीप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (1GB प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे.

संबंधित बातमी : 1 एप्रिलपासून व्हॉईस कॉलिंग मोफत, अंबानींकडून नव्या ऑफरची घोषणा