मुंबई : पॅनासॉनिक इंडियाने भारतात पी 55 मॅक्स हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी हे या स्मार्टफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. भारतात या फोनची किंमत 8 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे. पॅनासॉनिकच्या पी सीरिजचे स्मार्टफोन अगोदरपासूनच बाजारात उपलब्ध आहेत. मात्र एवढी मोठी बॅटरी क्षमता असलेला पॅनासॉनिकचा हा पी सीरिजचा पहिलाच फोन आहे. पॅनासॉनिकच्या या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असेल. यामध्ये क्वॅड एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. ज्यामुळे कमी प्रकाशातही चांगले फोटो काढता येतील, असा दावा कंपनीने केला आहे. पॅनासॉनिक P55 मॅक्सचे फीचर्स :
  • 5.5 इंच आकाराची एचडी-आयपीएस स्क्रीन
  • अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम
  • 1.24GHz क्वाड कोअर प्रोसेसर
  • 3GB रॅम, 16GB इंटर्नल स्टोरेज
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा