बंगळुरु : ग्लोबल मोबाइल अॅप समिट अवॉर्ड 2017 सोहळा नुकताच पार पडला. यावेळी व्यापार कॅटेगरीमधील सर्वोत्कृष्ट अॅप हा पुरस्कार मार्केटप्लेस इंडियामार्टला देण्यात आला आहे. बंगळुरुत आयोजित ग्लोबल मोबाइल अॅप समिटमध्ये कमर्शियल कॅटेगरीमध्ये बेस्ट अॅपचा पुरस्कार इंडियामार्ट पटकावला.
या अॅपमुळे अगदी सहजपणे व्यापार करता येतो. कंपनीनं शुक्रवारी एका पत्रकात म्हटलं की, या अॅपला त्याचे फीचर्स, ऑप्शनल सोल्यूशन आणि यूजर फ्रेंडली एक्सपिरिअंससाठी हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. प्ले स्टोअरमध्ये 4.4 रेटिंगसह इंडियामार्ट अॅप ई-कॉमर्स आणि ऑनलाइन मार्केटप्लेसमध्ये अव्वल स्थानी आहे. इंडियामार्टला 67 टक्के यूजर्सनं 5 स्टार रेटिंग दिलं आहे.
इंडियामार्टेचे संस्थापक दिनेश अग्रवाल म्हणाले की, 'इंडियामार्टमध्ये आम्ही ग्राहकांना लक्षात ठेऊन उत्पादन तयार करतो. मागील 4 वर्षापासून आम्ही अॅप यूजर्सच्या प्रत्येक फीडबॅकवर लक्ष ठेवतो.'
हे अॅप अँड्रॉईड, आयओएस आणि विंडोजवर उपलब्ध आहे. आतापर्यंत तब्बल 50 लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे.
सर्वोत्कृष्ट अॅपचा पुरस्कार इंडियामार्टला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2017 04:15 PM (IST)
ग्लोबल मोबाइल अॅप समिट अवॉर्ड 2017 सोहळा नुकताच पार पडला. यावेळी व्यापार कॅटेगरीमधील सर्वोत्कृष्ट अॅप हा पुरस्कार मार्केटप्लेस इंडियामार्टला देण्यात आला आहे. बंगळुरुत आयोजित ग्लोबल मोबाइल अॅप समिटमध्ये कमर्शियल कॅटेगरीमध्ये बेस्ट अॅपचा पुरस्कार इंडियामार्ट पटकावला.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -