मुंबई: पॅनासॉनिकनं आपला नवा स्मार्टफोन 'इलुगा टॅप' लाँच केला आहे. जलद प्रोसेसर आणि फ्रंट फिंगरप्रिंट स्कॅनर असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 8,990 रु. आहे.
या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. 4G VoLTE, 5 इंच फूल एचडी डिस्प्लेसोबत 1.25GHz क्वॉड-कोअर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम देण्यात आलं आहे. 16 जीबी इंटरनल मेमरी असून 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
पॅनासॉनिक इंडियाच्या मते, 'इलुगा टॅपचं फास्ट फिंगरप्रिंट सेन्सर तुम्हाला डिव्हाइस सुरु करण्याची सुविधा देतं. तसंच तुमची माहिती सुरक्षित ठेवतं. स्कॅनर तुमच्या बोटांचे किंवा अंगठ्यांचे ठसे अवघ्या काही सेकंदात ओळखतं.'