मुंबई: ई-मेल आयडी आता थेट मराठीमध्येही तयार करता येणार आहे. डाटा एक्सजेन टेक्नॉलॉजीज या कंपनीनं मराठीसह आठ भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडी मिळणार आहेत.

डाटा एक्सजेन टेक्नॉलॉजीज या कंपनीनं आता इंग्रजीसह आता मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, उर्दू, तामिळ, तेलगू आणि बंगाली या भाषांमध्ये ई-मेल आयडीची सुविधा आणली आहे.

यामध्ये कुणालाही आपल्या आवडत्या नावानं मेल आयडी तयार करु शकतं. फक्त यासाठी याचं अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावं लागेल. साईनअप केल्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेला आयडी तयार करता येईल.

तुमचं नाव@डाटामेल.भारत असा ई-मेल आयडी मिळू शकेल. भारतात मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर होतो. त्यामुळेच आता मराठी आणि इतर भाषांमध्ये ई-मेल आयडी तयार करण्यात आले आहे. जेणेकरुन कोट्यवधी यूजर्स त्याचा फायदा घेऊ शकतात.

सौजन्य: टेकवार्ता