मुंबई: पॅनेसॉनिकने आपला इल्युगा सिरीजमधील नवा स्मार्टफोन इल्युगा नोट लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत 13,290 रुपये आहे. हा स्मार्टफोन पॅनेसॉनिक स्मार्टफोन ऑफलाइन स्टोरवर ही उपलब्ध आहे.
या फोनमध्य 4GVoLTE आणि 16 मेगापिक्सल रियर कॅमेरा आहे.
स्मार्टफोनच्या स्पेसिफीकेशनमध्ये 5.5 इंचाची स्क्रिन आहे. ज्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 1080 x 1920 पिक्सल आहे. हा फोन 1.3 GHz ऑक्टाकोर प्रोसेसरवर काम करीत असून याची 3 जीबी रॅम आहे. तर 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवू शकतो.
इल्युगा नोटमध्ये ट्रिपल LED फ्लॅशसोबत 16 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनसाठी 3000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
तसेच कनेक्टिविटीसाठी 4G, वायफाय 802.11, GPRS, ब्लूटूथ 4.0सारखे फीचर देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन मार्शमैलो 6.0 ओएसवर चालतो.