उस्मानाबाद: उस्मानाबादच्या तरुणानं कडकनाथ कोंबड्या आणि अंडी OLX वरून महराष्ट्र आणि आंध्रात विक्री केली आहेत. उस्मानाबादच्याच पशुसंवर्धन अधिकऱ्यांना देशात नंबर वन उस्मानाबादी शेळीसाठी अँड्रॉईड अॅप तयार केलं आहे. शेतकरी या अॅपचा वापर करून जातिवंत शेळी देशभरात विकत आहेत. या ई-कॉमर्समुळं कोंबड्या आणि शेळ्यांना विक्रमी भाव मिळाला आहे.


 

फोटो काढा.. अपलोड करा... विका..

 

ओएलएक्सचा हाच फंडा वापरला उस्मानाबादच्या सिद्धार्थनं,

 

सिद्धार्थनं कडकनाथ कोंबडी आणि अंड्याचे फोटो काढले... ओएलएक्सवर पोस्ट केले... आणि मग काय... संपूर्ण देशभरातून ग्राहक सिद्धार्थला शोधत उस्मानाबादमध्ये आले.

 

सिद्धार्थने मुंबईतल्या सेंट्रल कुक्कुट रिसर्च सेंडरमधून ७०० रुपयांची एक दिवसाची कडकनाथ जातीची 105 पिल्लं विकत घेतली आणि साडे पाच महिन्यानंतर जन्मलेल्या अंड्याचे फोटो ओएलएक्सवर पोस्ट केले.

 

सध्याचं युग ई-कॉमर्स कंपन्यांचं आहे. हेच ओळखून पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणेंनी उस्मानाबादी शेळ्यांसाठी एका खास अँपची निर्मिती केली.

 

सोशल मीडिया आणि ई-कॉमर्सवर सर्वांना सारखीचं संधी मिळते. त्यामुळे भविष्यात जर का शेतकरी आपल्या मालाची थेट ऑनलाईन विक्री करु लागले, तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात यामुळे मधोमध पैसे खाणाऱ्या दलालांच्या कमिशनवर कायमची कात्री बसेल एवढं मात्र नक्की.

 

VIDEO: