आधार लिंक करण्यासाठी ज्या डेडलाईन देण्यात आल्या आहेत, त्या वाढवण्याचं आश्वासनही सरकारने दिलं आहे. मात्र डेडलाईन वाढण्याची वाट न पाहता आत्ताच ही प्रक्रिया पूर्ण करुन घेणं सोपं आहे. सरकारने आधार लिंक करणं अनिवार्य केलेल्या काही महत्त्वाच्या सेवांची यादी..
आधार सिम लिंकिंग
सध्या चालू असलेले सर्व मोबाईल क्रमांक पुन्ही रिव्हेरिफाय करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तर नवीन सिम घेण्यासाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे. 6 फेब्रुवारीपर्यंत सर्वांना आपला मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करायचा आहे. अन्यथा नंबर बंद पडू शकतो.
आधार आणि आर्थिक सेवा
बँक अकाऊंट, क्रेडिट कार्ड, विमा पॉलिसी, इक्विटी, म्युच्युअल फंड, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना अशा सेवांसाठी तुमचं आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. यासाठी 31 डिसेंबर 2017 ची डेडलाईन देण्यात आली आहे.
आधार आणि पॅन लिंकिंग
आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2017 ही अखेरची तारीख आहे. आधार पॅन कार्डशी लिंक न केल्यास तुम्हाला आयकर रिटर्न भरता येणार नाही.
आधार आणि अनुदान योजना
सरकारकडून ज्या योजनांसाठी अनुदान देण्यात येतं त्यासाठीही तुम्हाला आधारची माहिती देणं अनिवार्य आहे. या योजनांच्या लाभार्थींसाठी 31 डिसेंबर 2017 ही डेडलाईन आहे. यापूर्वी ही तारीख 30 सप्टेंबर होती. एलपीजी अनुदान, शिष्यवृत्ती योजना, पेंशन आणि शिधापत्रिका धारकांना आधारचा तपशिल देणं गरजेचं आहे.
आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?
आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.
वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.
दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
संबंधित बातम्या :