मुंबई : चीनमधील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ओप्पोने एक बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. A37 असं या नव्या स्मार्टफोनचं नाव असून, सेल्फीप्रेमींसाठी खास फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.


 

A37 स्मार्टफोनचे फीचर्स :

  • 5 इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले

  • 720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन

  • 1.5 GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक एमटी-6750 प्रोसेसर

  • 2 जीबी रॅम

  • 16 जीबी इंटरनल स्टोरेज

  • मायक्रोएसडीच्या सहाय्याने 128 जीबीपर्यंता स्टोरेज वाढवण्याची सुविधा

  • 5.1 लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टम


 

उत्तम कॅमेरा म्हणून या स्मार्टफोनकडे पाहिलं जात आहे. 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, तर सेल्फीप्रेमींसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर यामध्ये 2630mAh बॅटरी क्षमता असणार आहे.

 

वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएससाठी बेसिक कनेक्टिव्हिटीसोबतच या स्मार्टफोनमध्ये 4G सपोर्टही आहे. चीनमधील बाजारात या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 300 रुपये आहे.

 

ग्रे आणि रोझ गोल्ड रंगांमध्ये या स्मार्टफोनचे व्हेरिएंट उपलब्ध आहेत. भारतात हा स्मार्टफोन कधी लॉन्च होईल, याबाबत ओप्पो कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.