मूंबई : लिनोवोच्या Z सीरीजच्या लाँचिंगनंतर X सीरीज बंद करण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण कंपनीने नुकतीच या सीरीजमधील मोटो X प्ले 2016 ला बेंचमार्किंग साइट Geekbench वर लिस्ट केला आहे. यामध्ये या मोबाईलचे काही स्पेसिफिकेशनही देण्यात आले आहेत.
मोटो X प्ले 2016 चा मॅडेल नंबर XT156X ने साइटवर स्पॉट करण्यात आला आहे.या स्मार्टफोनमध्ये 4.6 इंचाचा डिस्प्ले असून रिझॉलेशन कपॉसिटी 1080 पिक्सल असणार आहे. तसेच या फोनमध्य़े 2.1 GHz मीडियाटेक हेलियो P10 ऑक्टो कोअर प्रोसेसर आणि 3 जीबीची रॅम असणार आहे. फोनमध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी देण्याच आली असून ती वाढवण्यात येऊ शकते.
या स्मार्टफोनला 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 8 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा असेल अशी माहिती कंपनीने साइटवर दिली आहे.