उत्कृष्ट सेल्फी कॅमेरा आणि जबरदस्त फीचर्स
उत्कृष्ट कॅमेरा हेच या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य असून, हा सेल्फी फोकस्ड फोन आहे. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांना हा स्मार्टफोन नक्कीच उपयुक्त असा आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असून, यामध्ये 1/3.1 इंच सेन्सर आणि f/2.0 अॅपरचर आहे. यामध्ये ब्युटिफाय 4.0 अॅपही आहे. या अॅपच्या माध्यमातून सेल्फी एडिट केलं जाऊ शकतं. यामध्ये सेल्फी पॅनोरमा आणि स्क्रीन फ्लॅश फीचर्सचाही समावेश आहे.
या स्मार्टफोनच्या होम बटनवर फिंगरप्रिंट सेन्सर असून, ओप्पोच्या माहितीनुसार, 0.22 सेकंदात स्क्रीन अनलॉक केलं जाऊ शकतं.
ओप्पो F1s स्मार्टफोनचे इतर फीचर्स:
- 1 अँड्रॉईड लॉलिपॉप सॉफ्टवेअर
- 5 इंचा एचडी आयपीएस डिस्प्ले
- गॉरिला ग्लास 4
- 3 जीबी रॅम
- ऑक्टा कोर मीडिया टेक MT 6750 SoC
- ऑटोफोकस आणि ड्युअल एलईडी फ्लॅश
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 32 जीबी इनबिल्ट मेमरी
- 4G LTE
- वाय-फाय
- यूएसबी ओटीजी
- जापीएस
- ब्लूटूथ
- 307mAh बॅटरी क्षमता
- ड्युअल सिम