या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसाठी एलजी कंपनीने माध्यमांना निमंत्रमाही पाठवलं आहे. माध्यमांना पाठवेलंल निमंत्रणही हटके आहे. या निमंत्रणपत्रिकेवर लिहिलं आहे, “प्ले मोअर”. एलजी कंपनी नक्की कोणता स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, याबाबतची माहिती निमंत्रणपत्रिकेवर देण्यात आली नाही.
LG V20 स्मार्टफोन हा LG V10 या स्मार्टफोनचा अपडेटेड व्हर्जन असल्याचं बोललं जात आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स असतील. या स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रीमियम सेगमेंटच्या फ्लॅगशिपमध्ये नवा ठसा उमटवण्याचा विश्वासही कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
LG V20 स्मार्टफोनचे फीचर्स:
- 5 इंच डिस्प्ले
- 1080 x 1920 रिझॉल्युशन
- 3/4 जीबी रॅम
- स्नॅपड्रॅगन 820 चिपसेट प्रोसेसर
- 32 जीबी आणि 64 जीबी स्टोरेज
- 256 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा