नवी दिल्ली : सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन गॅलेक्सी नोट 7 बाजारात उतरवल्यानंतर गॅलेक्सी नोट 5 ची किंमत कमी केली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आता 40 हजार रूपयांना उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची किंमत पूर्वी 54 हजार रूपये होती.
सॅमसंगने आपला गॅलेक्सी नोट 7 19 ऑगस्टपासून अमेरिकेच्या बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार हे अजून स्पष्ट झाले नाही. 11 ऑगस्ट रोजी भारतात कंपनी एक इव्हेंट करणार असून यावेळी आपला हा स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी नोट 7ची भारतातील किंमत 60,000 असण्याची शक्यता आहे.
सॅमसंग गॅलेक्सी 7 चे फीचर्स
डिस्प्ले : 1440X2560 पिक्सलचा 5.7 इंचाचा QHD सुपर अॅमोल्ड डिस्प्ले
प्रोसेसर : ऑक्टाकोअर Exynos 7420 प्रोसेसर (यात चार कॉरटेक्स-A57 कोर्स 2.1GHz आणि चार कॉरटेक्स A53 1.5GHz असतील)
मेमरी : 32 जीबी आणि 64 जीबी असे दोन व्हेरीअट
मेमरी कार्डचा पर्याय नसेल.
रॅम : 4जीबी LPDDR4
कॅमेरा : 16 मेगापिक्सल रीअर कॅमेरा तसेच 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
बॅटरी : 3000mAh
कनेक्टिविटी : 4G LTE, ब्लूटूथ 4.2, WIFI 802.11 a/b/g/n/ac, GPS/ A-GPS, मायक्रो USB 2.0 कनेक्टिविटी
रंग : व्हाइट पर्ल, ब्लॅक सेपियर, गोल्ड प्लॅटिनम आणि सिल्वर टायटॅनियम