मुंबई: ओपेरा मिनी या मोबाईल ब्राउजिंग अॅपलिकेशनने आपल्या स्मार्टफोन यूजर्सना नवे अपडेशन उपलब्ध करून दिले आहे. या नव्या अपडेटमध्ये यूजर्सना आता बॉलीवूड आणि क्रिकेटचे लेटेस्ट अपडेट मिळणार आहेत.

 

ओपेरा मिनी 18 सोबत बॉलीवूड हंगामा ही कंपनी अॅपरोच झाली आहे. तर स्पोर्टस अपडेटसाठी स्पोर्टकेडानेही क्रिकेट अपडेटसाठी होकार दर्शवला आहे.

 

या नव्या अपडेटमध्ये कंपनीने व्हिडीओ बुस्टचेही फिचर उपलब्ध करून दिले आहे. ओपेरा मिनीचे हे नवे अपडेशन यूजर्सना गूगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.