Blackberrys 5G Smartphone : BlackBerry Mobile द्वारे परवाना प्राप्त करणाऱ्या OnwardMobility ने जाहीर केले आहे की, कंपनी त्यांच्या "अल्ट्रा-सुरक्षित" 5G स्मार्टफोनच्या डेव्हलपमेंटसह पुढे जाणार नाही. ब्लॅकबेरी मोबाईल कंपनीने आपल्या जुन्या मोबाईलसाठी समर्थन संपवून या वर्षाच्या शेवटी कीपॅडसह 5G स्मार्टफोन लॉंच करण्याची योजना जाहीर केली होती. मात्र आता कंपनीने स्वत: या मोबाईलच्या प्लॅन डेडबद्दल सांगितलं आहे. एकेकाळी सर्वाधिक ज्या मोबाईलचा मार्केटमध्ये दबदबा होता तो मोबाईल आता कायमचा बंद होणार आहे. दरम्यान, OnwardMobility ने त्याच्या पुढील 5G स्मार्टफोनच्या योजना का रद्द केल्या हे अजूनही स्पष्ट केले नाही.
BlackBerry मोबाईल परवानाधारक OnwardMobility ने एका निवेदनात म्हटले आहे, "आम्ही OnwardMobility लाँच केल्यापासून तुम्ही आम्हाला दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. आम्ही अत्यंत दुःखाने जाहीर करतो की OnwardMobility बंद केली जाईल, आणि आम्ही यापुढे फिजिकल कीबोर्डसह अति-सुरक्षित स्मार्टफोन विकसित करणार नाही."
अल्ट्रा-सुरक्षित 5G ब्लॅकबेरी स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉंच केला जाईल असे सांगण्यात आले होते, परंतु हा स्मार्टपोन मार्केटमध्ये येऊ शकला नाही. जानेवारीमध्ये, सर्व क्लासिक ब्लॅकबेरी आणि ब्लॅकबेरी-चालित डिव्हाईससाठी समर्थन संपले. याचा अर्थ असा होतो की, मोबाईलला आवश्यक सॉफ्टवेअर अपडेट्स मिळाले नाहीत आणि यूजर्स कॉल, एसएमएस आणि आपत्कालीन कॉल यांसारख्या आवश्यक सेवा वापरू शकत नाहीत.
महत्वाच्या बातम्या :
- Red Heart Emoji : रेड हार्ट पाठवाल तर मिळेल मोठी शिक्षा, 'या' देशानं बनवला कायदा
- Singapore PM Remarks On Indian MPs : सिंगापूरच्या पंतप्रधानांचे भारतीय खासदारांवर वादग्रस्त वक्तव्य, परराष्ट्र मंत्रालयाचा आक्षेप
- Hollywood Sign : हॉलीवुडचा प्रसिद्ध साईनबोर्ड झाला 'RAMSHOUSE', नेमकं कारण काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha