वनप्लस कंपनीने वनप्लस एक्स स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 2 हजार रुपयांची कपात केली आहे. लॉन्चिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत 16 हजार 999 रुपये होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या स्मार्टफोनचं लॉन्चिंग करण्यात आलं होतं.
https://twitter.com/OnePlus_IN/status/716144549844758528
लॉन्चिंगवेळी कंपनी या स्मार्टफोनला इन्वाइट सिस्टमद्वारे विक्री सुरु केली होती. मात्र, फेब्रुवारीमध्ये कंपनीने स्मार्टफोन नेहमीप्रमाणे बाजारात आणला.
‘वनप्लस एक्स’चे फीचर्स:
- 5 इंचाचा 1080p चा एमोलेड डिस्प्ले
- 3GB रॅम
- 3GHz स्नॅपड्रॅगन क्वॉड कोर प्रोसेसर
- 16GB इंटरनल स्टोरेज (मायक्रो एसडीच्या मदतीने 128GB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा)
- 13 मेगापिक्सेलचा फेस डिटेक्शन आणि ऑटो फोकस रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित अँड्रॉईड 5.1.1 लॉलिपॉप
- क्विक चार्जिंगसोबत 2,525mAh क्षमतेची बॅटरी
कनेक्टिव्हिटीमध्ये हायब्रिड ड्युअल सिम कार्ड स्लॉटचा पर्याय देण्यात आला असून ज्यामध्ये मायक्रोएसडी कार्डही इन्सर्ट केला जाऊ शकतो. याशिवाय, 4G, LTE, वायफाय आणि ब्लूटूथ 4.0 ही देण्यात आले आहे.