मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नामांकित कंपनी एलजीने डासांना पळवून लावणारा टीव्ही लाँच केला आहे. या टीव्हीच्या किमतीची सुरुवात 26 हजार 900 रुपयांपासून होते. हा टीव्ही तुमचं मनोरंजन करेलच, पण त्यासोबतच डासांना पळवून लावण्याचं काम करणार आहे. या तंत्रज्ञानाच्या टॉप रेंजच्या टीव्हीची किंमत 47 हजार 500 रुपये आहे.


 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या टीव्हीमध्ये डासांना पळवून लावणाऱ्या अल्ट्रासॉनिक डिव्हाईस लावण्यात आलं आहेत. याला अॅक्टिव्हेट करुन डासांना पळवून लावता येईल. तसंच यात रेडिएशनचा धोका नसून केवळ टीव्हीच्या आवाजानेच डास पळून जातील.

 

हे तंत्रज्ञान ग्लोबल ऑर्गनाझेशनने आखून दिलेल्या नियमावलीनुसार बनवण्यात आलं आहे. तसंच याची इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अॅण्ड टॉक्सिलॉजीमध्ये चाचणी घेण्यात आली आहे.

 

यामध्ये कोणतंही केमिकल किंवा टॉक्सिक रिप्लेंटचा वापरण्यात आलेलं नाही. त्यामुळे याला रिफीलची किंवा मेंटेन करण्याची गरज नाही, असं कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

 

याचे अन्य फिचर्स स्टॅन्डर्ड टीव्हीप्रमाणेच असून हे ब्रॅण्ड स्टोअर्समध्येच उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यातील 80 इंची टीव्हीची किंमत 26 हजार 900 रुपये आहे. तर 108 इंची टीव्हीची किंमत 47 हजार 500 रुपये आहे.