Samsung S8 Tablet : सॅमसंगने आपला नवीन गॅलेक्सी टॅब एस 8 (Samsung S8 Tablet) भारतात लॉन्च केला आहे. लवकरच हा टॅब ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने हा टॅब Samsung S8, Samsung S8+ आणि Samsung S8 Ultra अशा तीन प्रकारात लॉन्च केला आहे. कंपनीने यामध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत, जे iPad लाही टक्कर देऊ शकतात. चला तर या टॅबच्या खास फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...     


Samsung S8 Ultra चे तपशील


सॅमसंगच्या या टॅबलेटमध्ये अल्ट्रा वाइड आणि अल्ट्रा कॅमेऱ्यांसह 12MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 14.60 इंचाची टच स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने टॅबलेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 1 प्रोसेसर दिला आहे. ज्यामध्ये तुम्ही उत्तम गेमिंगचा आनंद घेऊ शकता. या टॅबलेटमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1000GB पर्यंत वाढवता येऊ शकते. Samsung S8 Ultra टॅबलेटमध्ये Android 12 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच कंपनीने यात 11200mAh ची अतिशय पॉवरफुल्ल बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी ग्राहकांना या टॅबलेटमध्ये 45w सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. या टॅबलेटमध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.  हा टॅबलेट एस पेनसह येतो, ज्यामुळे तुम्ही हा टॅबलेट नोटपॅड म्हणूनही वापरू शकता.


फीचर्स 


Samsung S8+ टॅबलेटमध्ये 12.4-इंचाची सुपर एमोलेड स्क्रीन दिली आहे. यात 10,090mAh बॅटरी, फिंगरप्रिंट स्कॅनर देखील ग्राहकांना मिळणार आहे. टॅबलेटमध्ये 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच Samsung S8 टॅबलेटमध्ये 11 इंच स्क्रीन, 8000 mAh बॅटरी, फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आली आहे. या टॅबलेटमध्ये 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा टॅबलेट लवकरच Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. असे असले तरी यांची किंमत काय असलं, याचा खुलासा अद्यापही कंपनीने केलेला नाही आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha