OnePlus Nord CE 2 5G: वन प्लस कंपनीचा नोर्ड सीरीजचा आणखी एक स्मार्टफोन भारतात दाखल होतोय. वन प्लस कंपनीचा नॉर्ड सीई 2 5G स्मार्टफोन आज (17 फेब्रुवारी) भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीनं गेल्या वर्षी वन प्लस नॉर्ड सीई स्मार्टफोन लॉन्च केला होता. याच स्मार्टफोनला अपडेट्स करून कंपनी बाजारात नॉर्ड सीई 2 5G ला बाजारात दाखल करणार असल्याची माहिती आहे. या स्मार्टफोनच्या संभाव्य फिचर्स आणि किंमतीबाबत जाणून घेऊया.
वन प्लस नॉर्ड सीई 2 5G किंमत
एका टेक वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, वन प्लस नॉर्ड सीई 2 5G दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. 6GB + 128GB स्टोरेज असेलल्या स्मार्टफोनची किंमत 23 हजार 999 रुपये असू शकते. तर, 8GB + 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 24 हजार 999 रुपये असण्याची शक्यात आहे.
संभाव्य फिचर्स
नोर्ड सीई 2 5G हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 11 वर अधारीत असू शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5, HDR10+ सपोर्ट आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह 6.43-इंच फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्याची आल्याची माहिती समोर आलीय. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात सादर करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. या स्मार्टफोनमध्ये 4 हजार 500 क्षमता असलेली बॅटरीचा समावेश करण्यात आलाय
हे देखील वाचा-
- Realme 9 pro Series : Realme यूजर्ससाठी खुशखबर! कंपनीने लॉंच केले दोन नवीन स्मार्टफोन, 'हे'आहेत जबरदस्त फीचर्स
- Amazon Sale : iPhone घ्यायचाय.. मग 'या' ऑफरचा नक्की करा विचार
- Jio चा मोठा निर्णय; आता ब्रॉडब्रँडला 100 Gbps इंटरनेट स्पीड मिळणं शक्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha