मुंबई : वनप्लस या मोबाईल उत्पादक कंपनीने मोबाईलप्रेमींसाठी ऑफर्स उपलब्ध करुन दिली आहे. भारतात वनप्लस कंपनीला 5 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने कंपनीकडून एका खास सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑफरमध्ये कंपनीने ग्राहकांसाठी 3 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. सोबतच अॅमेझॉन या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीने देखील एचडीएससी बँकेच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डवर 5 हजारपर्यंतची सूट दिली आहे. 2 डिसेंबरपर्यंत या ऑफर्स राहणार आहेत.


या मॉडेलवर आहेत ऑफर
OnePlus 7 Pro -
वनप्लस 7 प्रो ची 44,999 रुपये किमतीचा आहे. मात्र, या ऑफरमध्ये हा फोन 39,999 मिळणार आहे. हा फोन 6 जीबी रॅम असलेल्या व्हॅरीएंटमध्ये येतो. तर, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी रोम असलेल्या व्हॅरीएंटमध्ये येणाऱ्या मोबाईलवर 3 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. हा फोन एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास 2000 रुपयांपर्यंत कॅशबॅक ग्राहकांना मिळेल. तर, फोन एक्सचेंजवर 7 हजारपर्यंतची सूट कंपनी ग्राहकांना देणार आहे.
OnePlus 7T


वनप्लस 7 टी या नुकत्याच लाँच झालेल्या फोनची किंमत 37,999 इतकी आहे, हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 रोम व्हॅरीएंटमध्ये येतो. या फोनवर कंपनी घसघसशीत 3 हजारांची सूट देत आहे. त्यामुळं हा फोन आता 34,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. तर, याच व्हॅरीएंटमधील 37,999 रुपयांचा फोन 37,999 रुपयांना मिळणारा आहे. तर एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास 1500 रुपयांपर्यंत कॅशबॅक ग्राहकांना मिळणार आहे.
OnePlus TV
सध्या सुरु असलेल्या विक्रीचा एक भाग म्हणून, अॅमेझॉन कंपनीने एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास वनप्लस टीव्हीवर 5 हजार तर, टीव्ही क्यू 1 प्रो 4 हजार रुपयांची भरघोस सूट मिळणार आहे. टिव्हीच्या एक्सचेंज ऑफरमध्ये 7,000 रुपयांपर्यंत सूट ग्राहक मिळवू शकता. सध्या वनप्लस टीव्ही क्यू 1 प्रोची किंमत 99,899 रुपये आहे. तर, वनप्लस क्यू 1 ची किंमत 69,899 रुपयांपासून सुरू होते.

चीनची कंपनी असलेल्या वनप्लस मोबाईल कंपनीला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच OnePlus 7T हा स्मार्टफोन आणि वनप्लस टीव्ही लाँच केले. ई-कॉमर्स संकेतस्थळ अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर हे मोबाईल उपलब्ध आहेत. याशिवाय, वनप्लसच्या अधिकृत संकेतस्थळ आणि वनप्लस स्टोअर्समधूनही स्मार्टफोन खरेदी करता येईल. पण, टीव्हीची विक्री मात्र केवळ अॅमेझॉनच्याच संकेतस्थळावर होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.