OnePlus 9 Pro 5G : OnePlus ने नुकताच एक नवीन स्मार्टफोन OnePlus 10T भारतात लॉन्च केला आहे. हा फोन लॉन्च होताच, कंपनीने वर्ष 2021 चा सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन OnePlus 9 Pro च्या किंमतीत कपात केली आहे. OnePlus 9 Pro फोनची किंमत तिसऱ्यांदा कमी करण्यात आली आहे. एप्रिल 2022 मध्ये या फोनची किंमत दुसऱ्यांदा बदलण्यात आली होती. त्यानंतर हा फोन 5,800 रुपयांनी स्वस्त झाला. आता OnePlus 9 Pro च्या किमतीत तिसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे आणि यावेळी फोन 4,200 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जाणून घ्या या फोनचे सर्व प्रकार आणि त्यांच्या किंमतीबद्दल..


OnePlus 9 Pro 5G ची नवीन किंमत
OnePlus 9 Pro दोन प्रकारात येतो. त्याचा पहिला प्रकार 8GB + 128GB स्टोरेज आहे, ज्याची किंमत दुसऱ्या किंमतीतील कपातीनंतर 54,199 रुपये होती, परंतु आता तिसरी किंमत कमी केल्यानंतर त्याची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचा दुसरा वेरिएंट 12GB + 256GB स्टोरेज आहे, ज्याची किंमत आधी 59,199 रुपये होती, परंतु आता तो 54,999 रुपयांना खरेदी करता येईल.


OnePlus 9 Pro 5G डिस्प्ले
OnePlus 9 Pro मॉर्निंग मिस्ट, पाइन ग्रीन आणि स्टेलर ब्लॅक या रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. OnePlus 9 Pro मध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले पॅनल आहे, ज्यामध्ये 1440 x 3216 पिक्सेल रिझोल्यूशन, 1300 nits पीक ब्राइटनेस, 120 Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ साठी सपोर्ट आहे.


OnePlus 9 Pro 5G कॅमेरा
OnePlus 9 Pro च्या मागील बाजूस चार कॅमेरे आहेत. यामध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा, 8MP टेलिफोटो लेन्स, 50MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मोनोक्रोम लेन्सचा समावेश आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.


सर्वात स्वस्त OnePlus Nord CE 2 Lite 5G


जर स्वस्त स्मार्टफोनबाबत बोलायला गेलं तर OnePlusने आजपर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G. हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, जो 64MP कॅमेरा सह येतो. फोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर, 33W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीसह 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Infinix Note 12 Pro: 256 GB स्टोरेज असलेला सर्वात स्वस्त फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत


Sony Xperia 5 IV 5G : Sony लवकरच लॉन्च करणार आपला  Waterproof Smartphone, जाणून घ्या