बंगळुरु : चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी वनप्लसने आज बंगळुरुच्या आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटरमध्ये दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. वनप्लस 7 प्रो आणि वनप्लस 7 अशी या दोन्ही फोन्सची नावे आहेत.
वनप्लस 7 प्रो मध्ये 8 कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर आहे. त्यासोबतच कंपनीने दावा केला आहे की, या मोबाईलची बॅटरी केवळ 20 मिनिटात 48 टक्के चार्ज होते. तसेच हा फोन गरम होऊ नये यासाठी यामध्ये लिक्विड कुलिंग ही सिस्टिम वापरण्यात आली आहे.
पहिल्यांदाच वनप्लसच्या मोबाईलमध्ये डॉल्बी सपोर्टेड स्पीकर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या कॅमेरामध्ये गुगल लेन्सचा सपोर्ट आहे. त्याच्या आधारे कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा फोटो काढल्यानंतर त्याच्याविषयी माहिती मिळवता येईल.
OnePlus7Pro मधील आणखी फिचर्स
6.7 इंचाचा FLUID AMOLED डिस्प्ले (वनप्लसच्या आतापर्यंतच्या फोन्समधील सर्वात चांगल्या दर्जाचा डिस्प्ले)
ब्लु लाईट फिल्टर
फोनच्या समोरील आणि मागील बाजूस Curved edges
Quad HD+Resolution
वनप्लस 7 प्रो च्या किंमती
6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल : 48,999 रुपये
8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल : 52,999 रुपये
12 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल : 57,999 रुपये
वनप्लस 7 च्या किंमती
6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल : 32,999 रुपये
8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल : 37,999 रुपये
OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro लॉन्च, किंमत फक्त...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2019 11:50 PM (IST)
चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी वनप्लसने आज बंगळुरुच्या आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटरमध्ये दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. वनप्लस 7 प्रो आणि वनप्लस 7 अशी या दोन्ही फोन्सची नावे आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -