नरेंद्र मोदी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत दावा केला. '1987-88 च्या सुमारास मी पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा वापरला. त्यावेळी मोजक्या व्यक्तींकडेच ईमेल आयडी होते. गुजरातमधील विरामगाममध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेत मी त्यांचा फोटो काढला. दिल्लीला तो ट्रान्समिट केला. दुसऱ्या दिवशी आपला रंगीत फोटो छापून आल्याचं पाहून अडवाणी अवाक झाले' असं मोदी म्हणाले.
भारतात पहिला डिजिटल कॅमेरा कधी आला? मोदींच्या दाव्यानंतर फॅक्ट चेक
नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया यूझर्सनी तात्काळ या दाव्यातील तथ्य पडताळून पाहण्यास सुरुवात केली. निकॉनने 1987 साली पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा तयार केल्याकडे काही जणांनी लक्ष वेधलं. तर 1995 च्या आधी ईमेल व्यवस्था सामान्य जनतेसाठी उपलब्धच नव्हती, असंही काही जणांनी सोशल मीडियावर मांडलं.
काही जणांना मोदींची ही मुलाखत काही सहन झाली नाही
अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी मोदींकडून प्रेरणा घेऊन सल्ले द्यायलाही सुरुवात केली
अनेक नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया मोदींच्याच तोंडी दिल्या
काहींनी मोदींच्या वैज्ञानिक ज्ञानाचं कौतुक केलं
शेवटी मोदींचं आणि विज्ञानाचं जुनं नातं आहे
बरं एवढं महाभारत चालू असताना सोशल मीडियावर 'भक्त' म्हणवले जाणारे कुठे आहेत?
एकविसाव्या शतकात अजून आपल्याला काय काय बघायला मिळणारे देव जाणे. लोकसभेसाठी एका बाजुला (रडारेंद्र) मोदी आहेत तर दुसऱ्या बाजुला हे महाशय
याबाबतीत मात्र दोघांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळतेय.
असे पर्याय असल्यावर बिचारा मतदार तरी काय करणार?