मुंबई : वनप्लस या प्रीमियम श्रेणीतील मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपनीचा OnePlus 7 हा फोन आज लाँच होणार आहे. अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर OnePlus 7 ची बुकिंग यापूर्वीच सुरु झाली असून या फोनबाबत जगभरातील स्मार्टफोन युजर्समध्ये कमालीची उत्सुकता आहे. आज रात्री 8.15 वाजता हा फोन लाँच होणार असून अमेरिका, युरोप आणि भारतात कंपनीकडून लाँचिंग इव्हेंट आयोजित करण्यात आले आहेत. भारतात हा इव्हेंट बंगळुरुच्या आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे. या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील करण्यात येणार आहे.
OnePlus 7 च्या फीचर्सबाबत अनेक अंदाज सध्या लावले जात आहेत. कंपनीकडून या फोनच्या प्रमोशन दरम्यान देण्यात आलेल्या माहितीवरुन हा फोन वनप्लसच्या याआधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक स्मूथ आणि फास्ट असेल असा अंदाज येतो. या फोनच्या डिस्प्लेबाबतीतही कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात आली आहे.
OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro अशी दोन मॉडेल्स कंपनीकडून आज लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. वनप्लसचा हा नवा फोन 5G सपोर्ट पहिला स्मार्टफोन असू शकतो. कॅमेरा हे नेहमी वनप्लसच्या ग्राहकांसाठी आकर्षण राहिलेलं आहे. सध्याच्या अनेक स्मार्टफोनमध्ये उत्तम दर्जाच्या फोटोसाठी मोबाईलच्या मागच्या बाजूला दोन कॅमेरे देण्यात येत आहेत. OnePlus 7 मध्ये मात्र ट्रिपल कॅमेरा वापरण्यात आल्याचं जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या फोनच्या कॅमेरा आणि फोटोशी संबंधित इतर फीचर्स बाबतही उत्सुकता आहे.
वनप्लस 7 प्रो ची अंदाजित किंमत
6 GB आणि 128 GB - 49,999 रुपये
8 GB आणि 256 GB - 52,999 रुपये
12 GB आणि 256 GB - 57,999 रुपये
वनप्लस 7 ची किंमत किती?
वनप्लस 7 च्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण वनप्लस 6 टीची लॉन्च प्राईसएवढीच वनप्लस 7 ची किंमत असू शकते. वनप्लस 6 टीच्या 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोअरेज मॉडेलची किंमत 37,999 रुपये होते. तर याच्या टॉप व्हेरिअंटची (8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोअरेज) किंमत 45,999 रुपये होती. वनप्लस 7 ची किंमतही या फोनच्या जवळपास असू शकते.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OnePlus 7, OnePlus 7 Pro आज लॉन्च होणार; अंदाजित किंमत आणि फीचर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2019 12:08 PM (IST)
वनप्लस 7 आणि वनप्लस 7 प्रोवरुन आज पडदा हटणार आहे. मागील काही महिन्यांपासून या दोन्ही फोनचे लीक्स समोर येत होते. तर कंपनीने काही फीचर्स कन्फर्म केले आहेत. एकाच वेळी दोन स्मार्टफोन लॉन्च करण्याची कंपनीची ही पहिलीच वेळ आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -