मुंबई : अॅमेझॉन इंडियाच्या 'समर सेल'ला 4 मेपासून सुरुवात होत आहे. या सेलमध्ये अॅपलच्या आयफोन X, वनप्लस 6टी, सॅमसंग गॅलेक्सी S9 सह इतर अनेक मोबाईल फोनच्या किंमतींवर चांगली सूट देण्यात येणार आहे.
4 मेपासून 7 मे पर्यंत अॅमेझॉनचा हा सेल असणार आहे. या सेलमध्ये मोबाईल फोन्सवर 40 टक्के पर्यंत सूट देण्यात येणार असल्याची माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. वनप्लस, रेडमी, रिअलमी आणि सॅमसंगचे मोबाईल फोन तसेच इतर उपकरणांचा या सेलमध्ये समावेश असणार आहे. या फोनच्या किंमतींबाबत आणखी अॅमेझॉनकडून माहिती देण्यात आलेली नसली तरी या सेलमध्ये कोणत्या मोबाईल फोन्सवर डिस्काउंट देण्यात येणार आहे त्याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. समर सेलमध्ये OnePlus 6T, Samsung Galaxy M20, Realme U1, Redmi 6A, Galaxy M10, Redmi Y2, Redmi 6 Pro, Honor View 20, Vivo NEX, Samsung Galaxy S9 या मोबाईल्सवर डिस्काउंट मिळणार आहे. 7 मे पर्यंत हा सेल सुरु असणार आहे.
मोबाईल फोनसह अॅमझॉन इंडियाच्या वेबसाईटवरील इतरही प्रॉडक्ट्सवर दरम्यानच्या काळात भरघोस सूट मिळणार आहे. एसबीआयचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यास 10 टक्के अतिरिक्त सूटही मिळणार आहे. 'अॅमेझॉन प्राइम'च्या सदस्यांना एक दिवस आधी म्हणजेच 3 मे पासून समर सेलच्या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
अॅमेझॉनचा 'समर सेल' 4 मे पासून, वनप्लस 6टी, आयफोन X वर मिळणार भरघोस सूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2019 02:35 PM (IST)
अॅमेझॉन इंडियाच्या 'समर सेल'ला 4 मेपासून सुरुवात होत आहे. या सेलमध्ये अॅपलच्या आयफोन X, वनप्लस 6टी, सॅमसंग गॅलेक्सी S9 सह इतर अनेक मोबाईल फोनच्या किंमतींवर चांगली सुट देण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -