मुंबई : वनप्लस 6 हा स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात लाँच करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनबाबतचे अनेक लीक रिपोर्ट समोर येत होते. अखेर आज हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. यामध्ये आयफोन X प्रमाणे नॉच, स्लो-मो, स्नॅपड्रॅगन 845 या सारखे बरेच फीचर देण्यात आले आहेत.


किंमत :

वनप्लस 6 हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 39,999 रुपये आहे.



21 मे पासून अमेझॉन प्राईम मेंबर हे अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन हा स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहेत. तर ओपन सेल हा 22 मे रोजी असणार आहे.

वनप्लस 6 चे खास फीचर्स :

वनप्लस 6 मध्ये 6.28 इंच फुल एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. याचं 1080x2260 पिक्सल रेझ्युलेशन आहे. तसंच यात गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनचे 6 जीबी / 8 जीबी रॅम असे दोन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये फेस अनलॉकसारखे फीचरही देण्यात आले आहेत. अवघ्या 0.4 सेंकदात हा फोन अनलॉक करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.



यामध्ये ड्यूल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 16 मेगापिक्सल तर सेकेंडरी लेन्स 20 मेगापिक्सल आहे. तर यामध्ये फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल देण्यात आला आहे. यामध्ये स्लो-मो (स्लो मोशन) व्हिडीओचा देखील ऑप्शन देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची खासियत म्हणजे त्याची बॅटरी. या स्मार्टफोनची बॅटरी 3300 mAh क्षमतेची आहे.