मुंबई : मच अवेटेड वनप्लस 6 या स्मार्टफोनच्या लाँचिंगची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. वनप्लस 6 हा स्मार्टफोन 17 मे रोजी लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या चीनच्या वेबसाईटवर ही घोषणा करत टिझर लाँच केला. शिवाय कंपनीने या फोनचं जोरदार प्रमोशन सुरु केलं आहे.
चीनमध्ये 17 मे रोजी सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता) लाँचिंग इव्हेंट होईल. या कार्यक्रमाचे तिकीटही उपलब्ध होणार आहेत. ज्यांना कार्यक्रम पाहायचा आहे, त्यांना 27 एप्रिलपासून तिकिटं बूक करता येतील.
कंपनीने या स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी मार्वल स्टुडिओसोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे अॅव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर व्हेरिएंट लाँच केलं जाणार आहे. त्यामुळे अॅव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर या सिनेमाचं तिकीट प्रेक्षकांना वनप्लसकडून मोफत दिलं जाणार आहे. 27 एप्रिलला लाँच होणाऱ्या सिनेमासाठी सहा हजार तिकिटं दिली जातील, जे 27, 28 आणि 29 एप्रिलसाठी असतील.
मुंबई, पुणे, नवी दिल्ली, बंगळुरु, कोलकाता, चंदीगड, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, कोची आणि अहमदाबाद यांसारख्या मोठ्या शहरांमधील वनप्लसच्या ग्राहकांना ही तिकिटं खरेदी करता येतील. तिकीट मिळवण्यासाठी ग्राहकांना वनप्लसच्या वेबसाईटवर जाऊन आपला IMEI नंबर टाकावा लागेल. त्यानंतर शहर निवडून गेट इट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तिकीट मिळेल.
वनप्लस 6 मध्ये खास काय?
वनप्लस 6 या फोनच्या लाँचिंगपूर्वी अनेक लीक रिपोर्ट समोर आले आहेत. त्यानुसार या फोनचे व्हाईट, ब्लॅक आणि ब्ल्यू असे तीन व्हेरिएंट येऊ शकतात. यामध्ये आयफोन X प्रमाणे जेस्चर कंट्रोल सपोर्ट फीचर असू शकतं. याशिवाय वनप्लस 6 मध्ये स्नॅपड्रॅगन 845 SoC आणि 8GB रॅम असू शकते, असाही दावा करण्यात आला होता.
वनप्लस 6 मध्ये 256GB इंटर्नल स्टोरेज दिलं जाईल, असं बोललं जातं. या फोनचं अॅव्हेंजर्स व्हेरिएंटही लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी कंपनीने वनप्लस 5T या फोनचंही स्टार वॉर्स लिमिटेड व्हेरिएंट लाँच केलं होतं. मोठी स्क्रीन, एलईडी फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर असे फीचर्स असू शकतात. हा फोन यावर्षी जूनपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मच अवेटेड वनप्लस 6 च्या लाँचिंगचा मुहूर्त अखेर ठरला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Apr 2018 03:03 PM (IST)
वनप्लस 6 हा स्मार्टफोन 17 मे रोजी लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या चीनच्या वेबसाईटवर ही घोषणा करत टिझर लाँच केला. शिवाय कंपनीने या फोनचं जोरदार प्रमोशन सुरु केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -