ट्रू कॉलरच्या फीचर प्रीमियम युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंगचं हे फीचर उपलब्ध असेल. यासाठी महिन्याला 49 रुपये, तर वर्षाला 449 रुपये युजर्सना भरावे लागतील. सध्या 14 दिवसांसाठी ट्रायल व्हर्जनही देण्यात आलंय.
ट्रू कॉलरवरील कॉल रेकॉर्डिंगचं फीचर अॅक्टिव्हेट करण्यासाठी काय कराल?
- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेलं ट्रू कॉलरचं अॅप अपडेट करुन, 13.7 हे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल.
- ट्रू कॉलर अॅपवर क्लिक केल्यानंतर होमस्क्रीनवर डाव्या बाजूला मेन्यूवर क्लिक करावं आणि कॉल रेकॉर्डिंगवर क्लिक करावं.
- त्यानंतर तुम्हाला तिथे फ्री ट्रायलचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन काही दिवसांसाठी फ्री ट्रायलचा पर्याय वापरु शकता. मात्र फ्री ट्रायल वापरण्यासाठी दिवसांची मर्यादा असेल.
- कॉल रेकॉर्डिंग सुरु केल्यानंतर, तुमचे रेकॉर्ड झालेले कॉल इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह होत जातील.
- तुमच्याकडे ऑटो आणि मॅन्युअल रेकॉर्डिंगचे पर्यायही उपलब्ध असतील.
दरम्यान, गूगलचं जे नवं व्हर्जन आहे, म्हणजे ‘अँड्रॉईड 9 पाय’मधून गूगलने ट्रू कॉलरचं हे फीचर हटवलं आहे.