मुंबई : व्हॉट्सअॅपने आपल्या यूजरच्या गरजा लक्षात घेत वेळोवळी अॅपमध्ये गरजेचे बदल केले आहेत. नेहमी नवनवीन फीचर आणल्यामुळे व्हॉट्सअॅप सध्या सर्वाधिक लोकप्रिय सोशल मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा आपल्या यूजरसाठी नवीन फीचर आणण्याची तयारी दाखवली आहे.
लवकरच व्हॉट्सअॅप आपल्या यूजरसाठी आणखी एक अपडेट घेऊन येत आहे. WABetaInfoच्या वृत्तानुसार नवीन अपडेटनंतर व्हॉट्सअॅपमध्ये आपल्याला 'डार्क मोड' हा पर्याय दिसणार आहे. यावर्षाच्या शेवटी व्हॉट्सअॅप हे फीचर घेऊन येण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅपच्याआधी यूट्युब, ट्विटर, डिस्कोर्ड आणि रेडडिटसारख्या अॅप्समध्ये 'डार्क मोड'चा पर्याय देण्यात आला आहे.
'WABetaInfo'च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपकडून डार्क मोड फीचरवर काम सुरू आहे. आपल्या नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप हे नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. लवकरच अॅन्ड्रॉई़ड फोन, आयफोन एक्समध्ये हे नवं फीचर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
यूजरच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी नवं फीचर
व्हॉट्सअॅपन ऑफिशिअली या नव्या फीचरबाबत कोणतीही घोषणी केलेली नाही. मात्र लवकरच व्हॉट्सअॅपकडून या नव्या डार्क मोड फीचरची घोषणा होण्याची शक्यता आहे. या नव्या अॅपच्या मदतीने मोबाईलमधील लाईट कमी होऊन यूजर्सच्या डोळ्यांवरील ताण होणार आहे. यूजर्सच्य डोळ्यांना जास्तीत जास्त आराम मिळावा, यूजरच्या डोळ्यांची काळजी घेणे हा मुख्ये हेतू या नव्या फीचरचा आहे.