मुंबई : कॅब सेवा देणाऱ्या ओला कंपनीने 'ऑटो-कनेक्ट वायफाय' सुविधेचा विस्तार केला आहे. ओलाच्या ऑटोमध्ये आता मोफत वायफाय सुविधा मिळू शकणार आहे.


देशातील 73 शहरांमध्ये ओलाकडून ऑटोची सेवा पुरवली जाते. ओला ऑटोमधील वायफायचा वापर करताना यूझर्सना आपला फोन वायफाय सेवेशी एकदाच जोडावा लागेल.

https://twitter.com/Olacabs/status/924895583743049729

ओला कंपनीचे अधिकारी सिद्धार्थ अग्रवाल यांनी सांगितले, "ऑटो कनेक्ट वायफायद्वारे तीनचाकी वाहनांना अधिक आधुनिक बनवण्याचा प्रयत्न आहे. शिवाय, ग्राहकांना अधिक चांगल्याप्रकारे ओला ऑटोशी जोडण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत."

काही दिवसांपूर्वीच ओला कंपनीने दावा केला होता की, "ओला प्राईमच्या ग्राहकांच्या माध्यमातून महिन्याला 200 टीबीहून अधिक डेटाचा वापर केला. एक ओला ग्राहक सरासरी 20 एमबी डेटाचा वापर करतो. 2014 मध्ये लॉन्च झालेल्या या ओलाच्या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 1 लाख 20 हजार हून अधिक नोंदणी झाली. ऑटो ड्रायव्हरसाठी ओलाच्या अॅपमध्ये इंग्रजी आणि हिंदीसह आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे."