नवी दिल्ली : नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 आज भारतात लाँच होणार आहे. एचएमडी ग्लोबलकडून हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरवला जाणार आहे. दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच केला जाईल.
एचएमडी ग्लोबलकडून बाजारात आणला जाणारा हा नोकियाचा चौथा फोन असेल. यापूर्वी एचएमडीनं नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 लाँच केले होते. मागच्याच महिन्यात हा फोन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाला होता, आता तो भारतातही उपलब्ध असेल.
आज फेसबुकवर नोकियाच्या या स्मार्टफोनचा इव्हेंट लाईव्ह असेल. भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत जवळपास 45, 200 रुपये असेल.
नोकिया 8 चे फिचर्स :
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉईड 7.1.1 नॉगट
रॅम : 4 जीबी
प्रोसेसर : क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 ऑक्टा कोअर प्रोसेसर
बॅटरी : 3090mAh
कॅमेरा : ड्युअल 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा विथ फ्लॅश
मेमरी : 64 जीबी (एक्सांडेबल 256 जीबी)
डिस्प्ले : 5.3 इंच क्युएचडी डिस्प्ले
नोकिया 8 आज भारतात लाँच होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2017 08:00 AM (IST)
नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 आज भारतात लाँच होणार आहे. एचएमडी ग्लोबलकडून हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरवला जाणार आहे. दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच केला जाईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -