नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबलने नोकियाचे तीन मच अवेटेड स्मार्टफोन नोकिया 6, नोकिया 5 आणि नोकिया 3 लाँच केले आहेत. नोकिया 6 ची किंमत 14 हजार 999 रुपये आहे, जो 14 जुलैपासून अमेझॉनवर उपलब्ध होईल. तर नोकिया 5 ची किंमत 12 हजार 899 रुपये आहे, जो 7 जुलैपासून प्री ऑर्डरसाठी अमेझॉनवर उपलब्ध असेल.


या तिन्ही स्मार्टफोनपैकी नोकिया 3 हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 9 हजार 499 रुपये आहे, जो 16 जूनपासून सर्व ऑफलाईन स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

नोकिया 6 या स्मार्टफोनच्या खरेदीवर अमेझॉनकडून ऑफरही दिली जाणार आहे. अमेझॉन पेचा पर्याय वापरुन स्मार्टफोन खरेदी केला तर 1 हजार रुपये डिस्काऊंट मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्ट ब्रँडच्या नावाशिवाय भारतात येणारा नोकियाचा हा पहिलाच फोन हे. शिवाय नोकियाने या अँड्रॉईड स्मार्टफोनसोबत भारतीय बाजारात पुन्हा पाऊल ठेवलं आहे.

नोकिया 3 स्मार्टफोनचे फीचर्स :

  • 5 इंच आकाराची स्क्रीन

  • 7.0 नॉगट सिस्टम

  • गूगल फोटोज अॅपमध्ये अनलिमिटेड क्लाऊड स्टोरेज

  • सिंगल सिम आणि ड्युअल सिम व्हेरिएंट

  • 1.3GHz क्वाड कोअर मीडिया टेक प्रोसेसर

  • 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटर्नल स्टोरेज

  • 8 मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा

  • 2650mAh क्षमतेची बॅटरी




नोकिया 5 स्मार्टफोनचे फीचर्स :

  • 5.2 इंच आकाराची स्क्रीन

  • फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 3000mAh क्षमतेची बॅटरी




नोकिया 6 स्मार्टफोनचे फीचर्स :

  • 7.0 नॉगट सिस्टम

  • 5.5 इंच आकाराची स्क्रीन

  • 3 जीबी रॅम, 64 जीबी इंटर्नल स्टोरेज

  • 3000mAh क्षमतेची बॅटरी

  • फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन

  • 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • साऊंड क्वालिटीसाठी डॉल्बी अॅटमॉस आणि ड्युअल अॅम्प्लिफायर