मुंबई : सॅमसंगने या वर्षाच्या सुरुवातीलाच गॅलक्सी C9 प्रो हा स्मार्टफोन लाँच केला. 6GB रॅम असणारा सॅमसंगचा हा पहिलाच फोन आहे. सॅमसंगने भारतात आता या फोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.


फ्लिपकार्टवर हा फोन आता केवळ 31 हजार 900 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची लाँचिंग प्राईस 36 हजार 900 रुपये होती. म्हणजेच सॅमसंगने या फोनच्या किंमतीत 5 हजार रुपये कपात करण्यात आली आहे.

दरम्यान कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात केल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सॅमसंग स्टोअर्समध्ये आणि फ्लिपकार्टवर हा फोन 5 हजार रुपयांच्या कपातीसह उपलब्ध आहे.

गॅलक्सी C9 प्रोचे फीचर्स :

  • अँड्रॉईड 6.0 सिस्टम

  • ड्युअल सिम

  • 6 इंच आकारीच स्क्रीन

  • ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 653 प्रोसेसर

  • 16 मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा

  • 64 GB स्टोरेज, 6 GB रॅम

  • 4000mAh क्षमतेची बॅटरी

  • ब्लॅक आणि गोल्ड असे दोन कलर व्हर्जन