मुंबई : नोकियाचा मच अवेटेड स्मार्टफोन नोकिया 6ची अखेर भारतात विक्री सुरु झाली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या मते, आतापर्यंत 10 लाख जणांनी या स्मार्टफोनसाठी नोंदणी केली आहे. या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये आहे.
नोकिया 6 हा स्मार्टफोन फक्त ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. दरम्यान, नोकियानं आपले आधीचे स्मार्टफोन नोकिया 5 आणि नोकिया 3 हे ऑफलाइन स्टोअर्सवर देखील उपलब्ध आहेत. हा सेल आज (बुधवार) दुपारी 12 वाजता सुरु झाला. पण काही क्षणातच या स्मार्टफोनची विक्री झाली.
नोकिया 6च्या पुढील सेलसाठी सध्या नोंदणी सुरु आहे. हा सेल 30 ऑगस्टला असणार आहे.
नोकिया 6चे खास फीचर्स
यामध्ये 5.5 इंच डिस्प्ले देण्यात आला असून याचं प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 430 आहे.
या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम देण्यात आली आहे.
32 जीबी इंटरनल स्टोरेज असून 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
यामध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.