मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल आपला नवा 4G स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी एअरटेलनं स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांशी चर्चाही सुरु केली आहे.
एअरटेलचा हा फोन दिवाळीपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनची किंमत 2,500 रुपयांपर्यंत असू शकते. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी या फोनसोबत अधिक डेटा आणि फ्री कॉलिंग देऊ शकतं.
हा स्मार्टफोन कंपनी अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. हा फोन सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लाँच होऊ शकतो.
एअरटेल यासाठी कार्बन आणि लावा या स्मार्टफोन मेकर कंपन्याशी चर्चा करत आहे. दरम्यान, दूरसंचार कंपनी आयडिया सेल्यूलर देखील आपल्या 4जी फोनवर सध्या काम सुरु आहे. हा फोन देखील लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.