मुंबई : एचएमडी ग्लोबलने भारतात आज नोकिया 5.1 प्लस हा फोन लाँच केला आहे. हा फोन अगोदर नोकिया 6.1 प्लस या स्मार्टफोनसोबत गेल्या महिन्यातच समोर आला होता. मात्र त्यावेळी किंमतीची घोषणा केली नव्हती.

एचएमडी ग्लोबलने आज अधिकृत घोषणा करत हा फोन 1 ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल, असं सांगितलं, ज्याची किंमत 10 हजार 999 रुपये असेल.

किंमत आणि लाँचिंग ऑफर्स

नोकिया 5.1 प्लसवर 1800 रुपये कॅशबॅक मिळणार आहे, तर ग्राहकांना एअरटेलकडून 240 जीबी डेटाही मिळेल. यासाठी 199 रुपये, 249 रुपये आणि 448 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.

नोकिया 5.1 प्लस फ्लिपकार्टसोबतच नोकियाच्या ऑनलाईन स्टोरच्या माध्यमातूनही खरेदी करता येईल. सध्या हा फोन नोकियाच्या वेबसाईटवर प्री ऑर्डर करता येईल. नोकिया 5.1 प्लस हा एकाच व्हेरिएंटमध्ये आहे. तीन जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असं हे व्हेरिएंट आहे. फोनची किंमत 10 हजार 999 रुपये आहे.

फीचर्स

अँड्रॉईड 8.1 ओरिओ

5.8 आकाराची स्क्रीन

मीडियाटेक हिलियो पी 60 चिपसेट

ड्युअल रिअर कॅमेरा (13+5 मेगापिक्सेल)

8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

3060mAh क्षमतेची बॅटरी