मुंबई : Motorola One Power भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची विशेषता म्हणजे स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, 5000mAh क्षमतेची बॅटरी, डिस्प्ले नॉच आणि दोन रिअर कॅमेरे मिळणार आहेत. या फोनला भविष्यात अँड्रॉईड अपडेटही मिळणार आहे. कंपनी म्हणून मोटोरोलाला मंगळवारी 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आगामी फोनसाठी कंपनीने गुगलशी भागीदारी केली आहे.
बाजारात Motorola One Power ची थेट टक्कर शाओमी रेडमी नोट 5 प्रो, असुस झेनफोन मॅक्स प्रो M1 आणि नोकिया 6.1 प्लसशी होणार आहे. लेनोव्होने Motorola One Power हा फोन सर्वात अगोदर आयएफए शो 2018 मध्ये लाँच केला तेव्हाच याबाबत माहिती समोर आली होती.
भारतीय बाजारात Motorola One Power ची किंमत 15999 रुपये आहे. या फोनचं एकच व्हेरिएंट असेल, जे चार जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेजमध्ये असेल. 15 ऑक्टोबरपासून फोनची विक्री सुरु होणार असली तरी यासाठी नोंदणी सुरु झाली आहे. हा फोन फक्त फ्लिपकार्टवर 15 ऑक्टोबरपासून मिळणार आहे.
Motorola One Power स्पेसिफिकेशन
अँड्रॉईड 8.0 सिस्टम
6.2 इंच आकाराचा फुल एचडी डिस्प्ले
ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर
चार जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज
ड्युअल रिअर कॅमेरा (प्रायमरी कॅमेरा 16 मेगापिक्सेल, सेकंडरी सेन्सर 5 मेगापिक्सेल)
12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
5000mAh क्षमतेची बॅटरी
फास्ट चार्जिंग
तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी, मोटोरोला वन पॉवर भारतात लाँच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Sep 2018 02:48 PM (IST)
फोनची विशेषता म्हणजे स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, 5000mAh क्षमतेची बॅटरी, डिस्प्ले नॉच आणि दोन रिअर कॅमेरे मिळणार आहेत. 15 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर हा फोन खरेदी करता येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -