मुंबई : मोबाईल जगतात क्रांती करणाऱ्या नोकिया कंपनीने 3310 या मोबाईल हँडसेटला नव्या स्वरुपात ग्राहकांसाठी बाजारात आणलं आहे. सोबतच नोकिया 5, नोकिया 6, नोकिया 3 चे नवे मॉडेल लाँच केले आहेत. स्पेनमधील बार्सिलोनात झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस या टेक इव्हेंटमध्ये हे फोन लाँच करण्यात आले.


नोकिया 3310 मध्ये 2.4 इंचाची कव्हर्ड स्क्रीन आणि बटन असलेला की-बोर्ड असणार आहे. 2 मेगापिक्सलचा फ्लॅश लाईट कॅमेरा, हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडियो, 16 एमबी इंटरनल स्टोरेज क्षमता जी 32 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या मोबाईलची बॅटरी 1200 mAh क्षमतेची आहे.

तब्बल 17 वर्षांनंतर नोकिया 3310 नव्या स्वरूपात येत आहे.  2005 साली बंद झालेल्या या मोबाईलचे 12 कोटींपेक्षाही जास्त युनिट विकल्या गेले होते.



... म्हणून नोकिया 3310 रिलाँच

स्मार्टफोनच्या जमान्यात अनेकांना सेकंडरी फोन म्हणून फीचर फोनची आवश्यकता असते. नोकिया 3310 हा दमदार बॅटरी बॅकअप असणारा फोन आहे. त्यामुळे स्मार्टफोन युझर्स या फोनला सेकंडरी फोन म्हणून वापरतील, असं कंपनीचं म्हणणं आहे.

एचएमडी ग्लोबल या फिनलँडच्या कंपनीने हा फोन लाँच केला आहे. नोकियाचा परवानाही याच कंपनीकडे आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये नोकिया 6 हा फोन लाँच केला असून हा फोन अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता.

नोकिया 3310 ची पाच वैशिष्ट्ये

नोकिया 3310 बद्दलच्या सर्व अफवा खऱ्या ठरल्या असून अनेक नवीन फीचर्ससह हा फोन बाजारात आला आहे

  • किंमत


नोकिया 3310 युरोपमध्ये 3450 रुपयात उपलब्ध असेल. मात्र इतर ठिकाणची या फोनची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

  • कलर डिस्प्ले


नवीन नोकिया 3310 मध्ये आता कलर डस्प्ले देण्यात आला आहे. 2.4 इंच आकाराच्या या डस्प्लेमध्ये विविध प्रकारचे वॉलपेपर देण्यात आले आहेत.

  • कॅमेऱ्याचा समावेश


नोकिया 3310 च्या नव्या मॉडेलमध्ये कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रायमरी कॅमेऱ्याचा वापर करता येईल. मात्र यामध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला नाही.

  • स्नेक गेम


नोकिया 3310 युझर्सची सर्वात आवडत्या स्नेक गेमचा या फोनमध्ये पुन्हा या फोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. मल्टीकलरमध्ये गेम या फोनमध्ये देण्यात आली आहे.

  • दमदार बॅटरी बॅकअप


जुन्या नोकिया 3310 प्रमाणेच या फोनमध्येही दमदार बॅटरी देण्यात आली आहे. 1200 mAh क्षमतेची ही बॅटरी 22 तासांचा टॉक टाईम बॅकअप देते, असा कंपनीचा दावा आहे.