नवी दिल्ली : बार्सिलोनामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमधील (MWC) प्री-इव्हेंटमध्ये नोकिया कंपनीने तीन अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च केले. नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 अशी तिन्ही स्मार्टफोनची नावं असून, यातील नोकिया 6 स्मार्टफोन कंपनीने याआधी चीनमध्ये लॉन्च केला होता. आता बार्सिलोनामधील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या माध्यमातून जागतिक स्तरावर लॉन्च केला.

नोकियाने लॉन्च केलेल्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये सर्वात आकर्षणाचा आणि प्रतिक्षेचा स्मार्टफोन ठरला तो 'नोकिया 3'. 17 वर्षांआधी ज्या फोनची सर्वात जास्त क्रेझ टेक्नोसॅव्हींमध्ये होती, त्या 'नोकिया 3310' या फोनला नव्या स्वरुपात बाजारात आणलं गेलंय. सप्टेंबर 2000 मध्ये 'नोकिया 3310' हा GSM फोन लॉन्च केला होता. कंपनीने त्यावेळी या फोनची सुमारे 12 कोटी 60 लाख हँडसेट्सची विक्री केली होती. नोकिया 3310 मध्ये जुन्या GSM मोबाईलमधील स्नेक गेम आणि रिंगटोनही पुन्हा अनुभवता येणार आहे. हा स्मार्टफोन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लॉन्च झालेले हे तिन्ही स्मार्टफोन लवकरच भारतीय स्मार्टफोनप्रेमींसाठी दाखल होणार आहेत.

'नोकिया 6'चा विक्रम

'नोकिया 6' स्मार्टफोन नोकिया कंपनीने याआधीच चीनमध्ये लॉन्च केला होता. फ्लॅश सेलच्या माध्यमातून बाजारात आणलेल्या या स्मार्टफोनसाठी 1 कोटीहून अधिक ग्राहकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. अवघ्या 23 सेकंदात स्मार्टफोनच्या 10 लाख हँडसेट्सची विक्री झाली होती.

'नोकिया' आता 'स्मार्ट'

नोकिया कंपनी पहिल्यांदाच 'स्मार्ट' झालीय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण नोकियाने पहिल्यांदाच अँड्रॉईड स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. याआधी नोकियाचे विंडोज हँडसेट बाजारात आले होते.

किंमती

नोकिया 3 ची किंमत सुमारे 9 हजार 782, नोकिया 5 ची किंमत सुमारे 12 हजार रुपये, तर नोकिया 6 ची किंमत सुमारे 16 हजार रुपये आहे.

नोकिया 6 चे फीचर्स -

- 1.2 गीगाहर्ट्झ स्नॅपड्रॅगन 430 ऑक्टा-कोर प्रोसेसर
- 4 जीबी LPDDR3 रॅम
- 64 जीबी इंटरनल मेमरी
- 5.5 इंच HD आयपीएस डिस्प्ले
- ड्युअल स्पिकर
- ड्युअल सिम
- 16 MP रिअर कॅमेरा (ड्युअल टोन LED फ्लॅश)
- 8 MP फ्रंट कॅमेरा
- 4G VoLTE/WiFi
- डॉल्बी डिजिटल
- 3000 mAh क्षमतेची बॅटरी