नवी दिल्ली : जपानी ऑटोमोबाईल कंपनी निसान मोटरने एसयूव्ही टेरानोचा नवा अवतार लॉन्च केला आहे. मुंबईतील ताज लँड्स एंड होटेलमध्ये या कारच्या लॉन्चिंगचा कार्यक्रम पार पडला. टेरानोमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

निसानच्या या नव्या टेरानोसाठी पहिल्या कारपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतील. सध्याच्या टेरानो कारची किंमत 9 लाख 99 हजार रुपये ते 13 लाख 95 हजार एवढी आहे.

भारतीय बाजारात टेरानो कारची स्पर्धा होंडा बीआरव्ही, महिंद्रा स्कॉर्पिओ, ह्युंदाई क्रेटा, टाटा सफारी स्टॉमर्म आणि रेनॉल्ट डस्टर यांसोबत असणार आहे.

फीचर्स -

  • 1.6 लीटर डिझेल आणि 1.5 लीटर पेट्रोल इंजिनचा पर्याय

  • 1.6 लीटर इंजिनमध्ये 103 हॉर्स पावरसोबतच 145 एमएन टॉर्क

  • नवी एलईडी लाईट देण्यात आली असून, दिवसा चालणारी हेडलाईन

  • फ्रंट आणि बॅक बम्पर नव्या रुपात

  • केबिनमध्येही अनेक बदल

  • सुरक्षेसाठी ईबीडीसोबत दोन-दोन एअर बॅग