मुंबई: शाओमीचा मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Mi6 11 एप्रिलला लाँच होऊ शकतो. चीनमधील सोशल मीडिया वेबसाईट वीबोवर लीक रेन्डरच्या मते, शाओमी आपला नवा स्मार्टफोन 11 एप्रिलला लाँच करणार आहे. MWC2017 मध्ये हा डिव्हाइस लाँच होणार अशी चर्चा होती. मात्र, शाओमीनं तेव्हा हा स्मार्टफोन लाँच केला नव्हता.
लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनसंबंधी अनेक लीक रिपोर्ट समोर येत आहे. लीक रिपोर्टसनुसार, शाओमी Mi6 स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर चिपसेट असू शकतं. याआधीच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होत की, Mi6 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असणार आहे.
लीक रिपोर्टनुसार, शाओमी Mi6 मध्ये 5.2 इंच फूल एचडी डिस्प्ले असेल. तसेच यामध्ये अँड्रॉईड 7.0 नॉगटवर चालेल. शाओमी Mi6 4 जीबी/32 जीबी आणि 4 जीबी/ 64 जीबीचे दोन व्हेरिएंट लाँच करु शकतं. याचा एक टॉप एंड मॉडेल असण्याचीही शक्यता आहे. ज्यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असेल.
या स्मार्टफोनमध्ये सोनी Xperia XZचा कॅमेरा देण्यात आला आहे. याचा रिअर कॅमेरा 19 मेगापिक्सल असू शकतो. तर याचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल असू शकतो.
रिपोर्टनुसार, याची किंमत 2,499 युआन (जवळजवळ 25,000) असू शकतं.