मुंबई: जपानी कंपनी निसाननं आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीनं आपलल्या 'सनी' कारच्या किंमतीत तब्बल 1.99 लाखांची कपात केली आहे. म्हणजे जवळजवळ दोन लाखांनी ही कार स्वस्त झाली आहे.
पेट्रोल कारच्या किंमतीत 1.01 ते 1.99 लाख रुपयांची सूट
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल व्हर्जनच्या बेसिक मॉडेलमध्ये 1.01 लाख रुपयांची सूट देण्यात आली असून आता ही कार 6.99 लाखांना खरेदी करता येणार आहे. तर याच कॅटेगरीत सर्वात अॅडव्हान्स व्हर्जनच्या किंमतीत 1.99 लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ही कार 8.99 लाख रुपये किंमतीला खरेदी करता येणार आहे.
डिझेल कारच्या किंमतीत 94000 ते 1.31 लाख रुपयांची सूट
डिझेल कारमधील बेसिक मॉडेलच्या किंमतीत 1.31 लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही कार 7.49 लाख रुपयात खरेदी करता येणार आहे. तर याच्या टॉप मॉडेलमध्ये 94000 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे ही कार 8.99 लाख रुपयांना खरेदी करता येणार आहे.
निसाननं मोठ्या प्रमाणात कारच्या किंमतीत कपात केली असली तरी आता ग्राहक या कारला पसंती देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.