काल भारतात लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनची किंमत S8 साठी 57, 900 तर S8+ साठी 64,900 रुपये असेल. या दोनपैकी कोणत्याही स्मार्टफोनच्या खरेदीवर दुप्पट डेटा मिळणार आहे.
या ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना या दोन स्मार्टफोनमध्येच जिओचं सिमकार्ड वापरावं लागणार आहे. जिओ धन धना धन ऑफर अंतर्गत 309 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 28 जीबी डेटासह जास्तीचा 28 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच महिन्याला 56 जीबीचा मोफत डेटा ग्राहकांना मिळणार आहे.
गॅलेक्सी S8 आणि S8+ स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी पुढील 8 महिने ही ऑफर देण्यात येणार आहे. त्यामुळे 8 महिने 224 जीबी अतिरिक्त डेटा म्हणजेच एकूण 448चा डेटा मिळणार आहे. या ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना जिओची प्राईम मेंबरशिप घ्यावी लागेल.
सॅमसंग गॅलक्सी S8 ची किंमत 57 हजार 900 रुपये, तर S8 प्लसची किंमत 64 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. हे फोन ब्लॅक, ब्ल्यू आणि गोल्ड कलरमध्ये असतील. अमेरिकेत S8 ची किंमत 46 हजार 700 रुपये, तर S8 प्लसची किंमत 54 हजार 500 रुपये आहे.
प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी स्मार्टफोनसोबत वायरलेस चार्जर मोफत देत आहेत. इतर देशांमध्ये कंपनी या फोनसोबत AKG हेडफोन्स मोफत देत आहे. यावेळी सॅमसंगने या फोनच्या डिझाईनमध्येही आकर्षक बदल केले आहेत.
गॅलक्सी S8 चे फीचर्स :
- 5.8 इंच एचडी स्क्रिन
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- बायोमेट्रिक अनलॉक सिस्टीम (फेस डिटेक्शननेही फोन अनलॉक करता येईल)
- सॅमसंग Exynos 8895 प्रोसेसर
- 4 GB रॅम
- 3000 mAh क्षमतेची बॅटरी
गॅलक्सी S8 प्लसचे फीचर्स :
- 6.2 इंच एचडी स्क्रिन
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- बायोमेट्रिक अनलॉक सिस्टीम (फेस डिटेक्शननेही फोन अनलॉक करता येईल)
- 4 GB रॅम
- 3500 mAh क्षमतेची बॅटरी