मुंबई : निकेश अरोरा यांच्या खांद्यावर पालो अल्टो नेटवर्क या सायबर सिक्युरिटी फर्मच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) धुरा देण्यात आली आहे. अरोरा यांना पालो अल्टो नेटवर्ककडून 12.8 कोटी डॉलरचं (सुमारे 858 कोटी रुपये) पॅकेज देण्यात आले आहे. जगात सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत अरोरा यांचं नाव दाखल झालं आहे.


50 वर्षीय निकेश अरोरा यांची मार्क मिकलॉकलीन यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. मिकलॉकलीन हे गेल्या सात वर्षांपासून पालो अल्टो नेटवर्कच्या सीईओपदावर होते. सीईओपदासह निकेश अरोरा हे पालो अल्टो नेटवर्कचे प्रेसिडंटही असतील. त्यामुळे मिकलॉकलीन यापुढे पालो अल्टो नेटवर्कचे व्हाईस चेअरमन म्हणून कंपनीशी जोडलेले असतील.

टीम कूक आणि बॉब लेजर यांच्या रांगेत निकेश अरोरा

12.8 कोटी डॉलर पॅकेज असणारे निकेश अरोरा यांचे पॅकेज हे 'अॅपल'चे सीईओ टीम कूक यांच्या पॅकेजएवढे झाले आहे. त्यामुळे निकेश अरोरा हे आता टीम कूक (अॅपल) आणि बॉब लेजर (वॉल्ट डिज्नी) यांच्या रांगेत जाऊन बसले आहेत.

निकेश अरोरा यांचा नेमका पगार किती?

निकेश अरोरा यांना वर्षिक 1 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 6.7 कोटी रुपये असेल. एवढेच नव्हे, अरोरा यांना बोनसही मिळणार आहे. त्याचसोबत, अरोरांना 268 कोटींचे रिस्ट्रिक्टेड शेअरही मिळतील. मात्र हे शेअर ते सात वर्षांपर्यंत विक्री करु शकत नाहीत.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, निकेश अरोरांना देण्यात आलेले पालो अल्टो नेटवर्कचे शेअर पुढल्या 150 टक्के वाढल्यास, त्यांना 442 कोटी रुपये मिळतील. एवढंच नव्हे, तर अरोरा हे पालो अल्टो नेटवर्कचे 134 कोटींपर्यंत शेअर खरेदी करु शकतात.

गूगलसोबतही काम

निकेश अरोरा यांनी याआधीही जायंट कंपन्यांसोबत काम केले आहे. 2004 साली अरोरांनी इंटरनेट जगतातील जायटं असलेल्या गूगलसोबत काम करण्यास सुरुवात केली. गूगलमधील अनेक महत्त्वाच्या कामगिरींचे ते मुख्य होते. 2004 ते 2007 या कालावधीत अरोरा गूगलचे युरोप ऑपरेशनचे व्हॉईस प्रेसिंडत होते. त्यानंतर आफ्रिका रिजनसाठी त्यांनी 2009 पर्यंत काम केले. 2009 ते 2010 या काळात गूगलचे ग्लोबल बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रेसिडंट राहिले. 2011 मध्ये  गूगलमध्ये चीफ बिझनेस ऑफिसर बनले आणि त्यानंतर 2014 मध्ये अरोरा यांनी गूगलला राम राम ठोकला.

त्यानंतर निकेश अरोरा हे सॉफ्ट बँकेचे सीओओ म्हणून जॉईन झाले होते. 2016 पर्यंत सॉफ्ट बँकेत त्यांनी काम केले. आता जून 2018 मध्ये पालो अल्टो नेटवर्कसोबत काम सुरु केलं आहे.

निकेश अरोरा कोण आहेत?

निकेश अरोरा यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1968 रोजी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे झाला. निकेश यांचे वडील भारतीय वायूदलात अधिकारी होते. दिल्लीतील एअरफोर्सच्या शाळेत अरोरो यांचं शिक्षण झालं. पुढे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग आयआयटी वाराणसीमधून 1989 साली पूर्ण केली. आयआयटीच्या पदीवनंतर त्यांना विप्रोत नोकरी मिळाली. मात्र त्यांना लवकरच नोकरी सोडली आणि पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात दाखल झाले. त्यांतर अमेरिका नॉर्थ-ईस्टर्न यूनिव्हर्सिटीतून एमबीएची पदवी मिळवली.