Infinix Note 12 Pro 4G : Infinix ने मागच्याच आठवड्यात Infinix Note 12 Pro 4G स्मार्टफोनच्या भारतात लॉन्च होण्याची घोषणा केली होती. हा स्मार्टफोन आता 26 ऑगस्ट 2022 रोजी भारतात लॉन्च होणार असे सांगण्यात आले आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart)  लॉन्च सेक्शनच्या माध्यमातून Infinix Note 12 Pro स्मार्टफोन लॉन्च केला जाईल. या स्मार्टफोनची किंमत किती असणार, तसेच यामध्ये कोणते फिचर्स आहेत? या संदर्भातील अधिक माहिती जाणून घ्या.   


Infinix Note 12 4G + फिचर्स :



  • Infinix Note 12 4G मध्‍ये सर्क्युलर कॅमेरा बेटासह फ्लॅट बॅक आहे, ज्यामध्ये तीन कॅमेरा कटआउट्स उपलब्ध आहेत.

  • Infinix Note 12 4G च्या उजवीकडे पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकरसह सपाट बाजू आहेत.

  • Infinix Note 12 4G मध्ये FHD+ रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 6.7-इंच AMOLED पॅनेल आहे.

  • Infinix Note 12 4G स्मार्टफोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि ऑप्टिक्ससाठी AI लेन्स देण्यात येत आहेत.

  • सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी Infinix Note 12 4G मध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

  • Infinix Note 12 4G मध्ये 33W रॅपिड चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 

  • Infinix Note 12 4G स्मार्टफोनमध्ये XOS 10.6 ओव्हरले अंतर्गत Android 12 दिला जात आहे.


Infinix Note 12 4G चिपसेट : 


Infinix Note 12 4G मध्ये MediaTek Helio G99 चिपसेट दिला जात आहे, या चिपसेटसह येणारा हा भारतातील पहिला डिव्हाईस असेल. Helio G99 हा मुळात Helio G96 चिपसेट आहे, जो आता 12nm नोडऐवजी 6nm नोडसह येतो. चिपसेटसह 8GB LPDDR4x रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज देण्यात आला आहे. 


Infinix Note 12 4G किंमत : 


Infinix हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करत आहे. Infinix Note 12 4G ची किंमत 15 हजारांपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे. याशिवाय, त्याचा 5G व्हेरिएंटला Infinix Note 12 5G भारतात 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या :